शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोरोनाचा धुळे जिल्ह्यात चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:01 IST

धोका वाढला : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १६ झाली

धुळे : येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल गजानन कॉलनीतील दाखल धुळ्यातील लोकप्रतिनिधीचा नातेवाईक ४५ वर्षीय कोरोना बाधीत रूग्णाचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. तर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मयत रुग्णाचा अहवालही पॉझीटीव्ह निघाल्याने शहरात कोरोनाचे चार बळी झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी वैद्यकीय महाविद्यालयातील सात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आता जिल्ह्यातील उपचार घेणारे १२ आणि मयत चार असे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्हयाचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे.धुळे शहरातील वडजाई रोडवरील गजानन कॉलनी परिसरात राहणाºया धुळ्याचे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक ४५ वर्षीय व्यक्तीचा २० एप्रिल रोजी कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. दुपारी सोशल डिस्टन्सिंग आणि शासकीय नियमांचे पालन करत एका दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला.दरम्यान धुळे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे मनपाचे माजी नगरसेवकाचे बंधुचा गुरुवारी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा अहवालही कोरोना पॉझीटीव्ह आला आहे.तसेच साक्री येथील ५३ वर्षीय व धुळ्यातील मच्छिबाजार परिसरातील ५७ वर्षीय प्रौढाचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे.एकाच दिवशी सात पॉझिटिव्हजिल्ह्यात एकाच दिवशी सात नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात धुळे शहरातील मच्छीबाजार परिसरातील मयत कोरोना बाधीत रुग्णाच्या कुटुंबातील सहा तर शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता १५ वर पोहचली आहे. दरम्यान आतापर्यंत ४४३ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात ४२८ जण निगेटिव्ह आहेत. ४२ रुग्णांचे अहवाल अद्याप बाकी आहेत.शिरपूरही तीन दिवस लॉकडाउनशिरपूर तालुक्यातील आमोदे येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिलेच्या आईचे एक महिन्यापूर्वीच मुंबईला पायाचे आॅपरेशन झाले होते. त्यानंतर आई - लेकी परत आमोद्याला आल्या. त्यापैकी मुलीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.झोन ठरविण्याचे निकषज्याठिकाणी १५ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्याठिकाणी संख्या वाढत आहे तो भाग रेडझोनज्याठिकाणी १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढलेली नाही ते भाग आॅरेंज झोनजेथे गेल्या २८ दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही व आहे ते रुग्णही पूर्णपणे बरे झाले आहेत तो भाग ग्रीन झोन.धुळे शहरातील सहा तर शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील महिला असे एकूण सात रुग्ण पॉझिटीव्ह निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १५ झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. आताही धुळेकर नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखावे आणि सोशल डिस्टन्सिंगने घरातच राहून आपला आणि परिवाराचे संरक्षण करुन जिल्हा प्रशासनाला साथ द्यावी, हे कळकळीची विनंती आहे.- डॉ.दीपक शेजवळ, समन्वयक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे