शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी स्विकारले आॅनलाईनचे आधुनिक तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 20:50 IST

शिरपूर । दुर्गम भागात नेटवर्कचे अडथळे असतानाही त्यावर केली मात, घेतले शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शिरपूर हा निम्मा आदिवासी तालुका आहे़ येथील आदिवासी डोंगरदऱ्यांमध्ये वास्तव्यास आहे़ कोरोना रोगामुळे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, स्मार्टफोन, लॅपटॉप, लहान, तरूण, थोर व्यक्तींकडे दिसू लागले आहेत़ आॅनलाइन शिक्षण झाल्याने आता दुर्गम भागातील मुलांकडे मोबाईल वा लॅपटॉप दिसू लागले आहेत़चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले वर्ग, समोर डायसवर उभे राहून अध्यापन करणारे शिक्षक हे चित्र कोरोनामुळे पालटले आहे़ त्याऐवजी शाळांतील वर्गांमध्ये एकमेव गुरूजी मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असल्याचे दिसत आहे़ कोरोनामुळे वार्षिक परीक्षेच्या आधीच मार्च महिन्याच्या अखेरीला सर्व शाळा लॉकडाऊन झाल्या़ उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर १५ जूनला शाळा उघडतात़ मात्र आज-उद्या करता-करता निम्मा सप्टेंबर महिना संपला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत़ आता दिवाळीनंतरच शाळा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने निम्मे सत्र विद्यार्थी घरीच असणार आहेत़ विद्यार्थ्यांच्या घरबसल्या शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेने पुढकार घेतला असून व्हॉटस्अ‍ॅप आणि गुगल मिटने विद्यार्थ्यांचे आॅनलाईन तास सुरू झाल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात पहायला मिळत आहे़ कोरोनावर मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण देवून त्यांचे वर्ष वाया जावू नये यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत़ शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम शहरासह गावोगावी लाबविला जात आहे़ या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांना अडचणी असल्या तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही दिसते़ अनेक शाळांतील शिक्षकांनी वाडी-पाड्यावर जावून आणि पारावर शाळा भरविण्याचा उपक्रम राबविला़ मात्र कोरोना ग्रामीण भागातील वाड्यापाड्यांवरही पोहोचल्याने आॅनलाईन तास घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे समोर आले आहे़