नंदीरोड आणि मौलवीगंज कॉर्नर येथील पुलाचे होणार बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST2021-02-21T05:07:35+5:302021-02-21T05:07:35+5:30
अल्पसंख्याक प्रभागातील मौलंवीगंज कार्नर येथील पूल लहान असल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात ...

नंदीरोड आणि मौलवीगंज कॉर्नर येथील पुलाचे होणार बांधकाम
अल्पसंख्याक प्रभागातील मौलंवीगंज कार्नर येथील पूल लहान असल्याने सांडपाणी व पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये. तसेच स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार फारूक शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून प्रलंबित असलेला नंदीरोड आणि मौलवी गंज कॉर्नर येथील नवीन पुलाचे बांधकाम मार्गी लावले आहे. या कामाचे उद्घाटन आमदार फारूक शाह यांच्यासह नगरसेवक सईद बेग, गनी डॉलर, सलीम शाह, नासीर पठाण, महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शकीला आफा, शहराध्यक्ष नुरा शेख, वसीम अक्रम, गुफरान पहेलवान, आतिक अहमद सर, मुश्ताक सेठ, इस्राईल सेठ, हाजी कमर ली, कैसर पेंटर, चिराग खाटिक, सेहबाज शाह, परवेज शाह, आसिफ शाह, निसार अन्सारी, सऊद आलम, मुक्कू अन्सारी आदी उपस्थित होते.