शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

पुलांची स्थिती..नजर हटी..दुर्घटना घटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:14 IST

शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शहराजवळील दोन ...

शिरपूर : शहरालगत असलेल्या नदीवरील पुलाचे कठडे तुटले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहराजवळील दोन तर राज्य महामार्ग शिरपूर-शहादा महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरील कठडे, सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने वाहन धारकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी लहान पुलांवर कठडेच बसविलेले नसल्याने अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत़शिरपूर शहरालगत असलेल्या आमोदे गावाकडे जाणारा रस्त्यावरील अरूणावती नदीवर लहान पूल बांधण्यात आला आहे़ जेव्हा-जेव्हा या नदीला महापूर आला, त्या-त्यावेळी या पूलाचे कठडे वाहून गेले आहेत़ गेल्या वर्षी देखील या नदीला महापूर आल्यामुळे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलावर वाहून गेलेले कठडे नव्याने बसविण्यात आलेले नाहीत़ मात्र याच पूलाशेजारी मोठा पूल करण्यात आल्यामुळे त्या पूलावरून देखील अधिक वर्दळ असते़ असे असले तरी या पूलाचे कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे़ लहान पूलावरून देखील नेहमीच वाहनांची वर्दळ असते़तसेच शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरूणावती नदीवर उंटावद गावाकडे जाणारा पूलाचे देखील कठडे महापूरामुळे वाहन गेले आहेत़ गेल्या ९ आॅगस्टला आलेल्या पूरामुळे नेहमीप्रमाणे कठडे वाहून गेले आहेत़ तेव्हापासून या पूलाला पुन्हा कठडे बसविण्यात आलेले नाहीत़ याच नदीवर पुन्हा बाळदे गावाजवळ तिसरा पूल बांधण्यात आलेला आहे़ याही पूलाची परिस्थिती तशीच आहे़गेल्या वर्षी नदी-नाल्यांना आलेल्या महापूरामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील पुलाचा भराव, पुलाचे कठडे वाहून गेले तर रस्त्यांचे डांबरीकरण उखडून गेल्यामुळे त्या रस्त्यावर ये-जा करणे धोकेदायक ठरू लागले आहे़ शहरातील अरूणावती नदीला आलेल्या महापूरामुळे देखील शिरपूर-उंटावद गावाला जोडणारा पूलाच्या वरपर्यंत पाणी वाहिले होते, त्यामुळे या पुलाचा भराव वाहून गेला होता़ त्यामुळे काही दिवस रहदारीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता़ मात्र नागरिकांचे हाल होवू लागल्यामुळे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी तातडीने तो भराव बुजून टाकल्यामुळे रहदारी पुर्ववत सुरू करण्यात आली होती़