धुळे जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:30 IST2019-11-25T11:29:51+5:302019-11-25T11:30:09+5:30

प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक शौचालये बांधून त्यावर रंगकाम करणार

Clean toilet campaign started in Dhule district | धुळे जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय अभियान सुरू

धुळे जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय अभियान सुरू

आॅनलाइन लोकमत
धुळे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातर्फे ‘स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देश हगणदारीमुक्त झालेला आहे. सार्वजनिक ठिकाणी व तरंगती लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालय असणे गरजेचे आहे. याच हेतूने हे अभियान १ नोव्हेबरपासून सुरू झालले आहे. ते ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. या अभियानांतर्गत सार्वजनिक शौाचलये बांधणे, रंगणविणे आणि त्यांच्या देखभालींची व्यवस्था करणे यासाठी गाव, तालुका, जिल्हा यांना या अभियानात सहभागी करून घेतले आहे.सार्वजनिक शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयी स्वमालकीची भावना वाढविणे, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होणे हा आहे. या अतंर्गत प्रत्येक गावात एक सार्वजनिक शौचालय बांधणे गरजेचे असून, या शौचालयांलयावर रंगकाम करून त्यावर स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांना बक्षीस देणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले आहे.

Web Title: Clean toilet campaign started in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे