प्रेम प्रकरणातून दोन गटांत हाणामारी; देवपुरातील घटना; चौघांना दुखापत

By देवेंद्र पाठक | Updated: May 13, 2023 18:05 IST2023-05-13T18:05:40+5:302023-05-13T18:05:49+5:30

धुळे : एका प्रेम प्रकरणाच्या कारणावरून देवपुरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री घडली. या हाणामारीत ...

Clash between two groups over a love affair; Incident in Devpur; Four injured | प्रेम प्रकरणातून दोन गटांत हाणामारी; देवपुरातील घटना; चौघांना दुखापत

प्रेम प्रकरणातून दोन गटांत हाणामारी; देवपुरातील घटना; चौघांना दुखापत

धुळे : एका प्रेम प्रकरणाच्या कारणावरून देवपुरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री घडली. या हाणामारीत चार जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद मात्र झालेली नाही. या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. देवपुरातील एका भागातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. तिचा सर्वत्र शोध घेणयात आल असता ती मिळून नाही.

याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मुलीचा शोध हा पोलिसांसह पालकांकडून सुरू असतानाच ती मुलगी देवपुरातच असल्याची माहिती मुलीच्या पालकांना समजली. माहिती मिळताच दोघे-तिघे समजाविण्यास अणि मुलीला परत आणण्यासाठी रवाना झाले; मात्र त्यांचे काहीही न ऐकता उलट त्यांना मारहाण करण्यात आली. यात चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. मुलांना मारहाण झाल्याचे कळताच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करीत पुन्हा एक गट समोरच्या गटावर चालून गेला. यामुळे दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली.

दोन्ही गटांतील महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने गर्दी केली हाेती. देवपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले होते. पोलिसांना पाहून अनेकजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर महिलांनी मुलीला पळवून आणल्याचा जाब विचारत देवपूर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता.

Web Title: Clash between two groups over a love affair; Incident in Devpur; Four injured