धुळे : शॉक लागून मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळे तालुक्यातील मुकटी गावात गुरुवारी दुपारी घडली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़धुळे तालुक्यातील मुकटी गावात संतोष नारायण पाटील हे कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे़ गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा रितेश पाटील (१७) याला घरातच इलेक्ट्रीक शॉक लागला़ आरडा ओरड झाल्याने त्यांच्या नातलगासह आजू-बाजूच्या नागरीकांनी धाव घेतली़ त्याला गावातील खासगी रुग्णालय आणि तेथून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}