मुख्याधिकारी अमोल बागुल व वैद्यकीय अधिकारी डॉ. नीतू बत्रा या कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:22+5:302021-02-06T05:07:22+5:30
शिरपूर एम. बी. ग्रुप यांनी शिरपूर येथे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांचे अंतिम संस्कार पार पाडण्याच्या समूहालाही पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात ...

मुख्याधिकारी अमोल बागुल व वैद्यकीय अधिकारी डॉ. नीतू बत्रा या कोरोना योद्ध्यांचा सन्मान
शिरपूर एम. बी. ग्रुप यांनी शिरपूर येथे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांचे अंतिम संस्कार पार पाडण्याच्या समूहालाही पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. लाकडाऊन काळात शहर व परिसरात प्राणिमात्रांची काळजी व सुश्रुषा करणारे प्राणी मित्र अभिजीत पाटील यांनाही पालक मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्याबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगरसेवक, कर्मचारी व शिरपूर शहरातून सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोविड-१९ साथरोग निवारणाकरिता उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.