शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

अमरावती प्रकल्पात एक तपापासून ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:52 IST

प्रकाशा-बुराईतून पाणी टाकण्याची वारंवार मागणी : एक अपवाद वगळता मृतसाठा क्षमता देखील ओलांडली नाही

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात प्रकाशा-बुराई योजनेतून पाणी टाकण्याची प्रक्रिया लवकर मार्गी लावा, अशी मागणी वारंवार होत आहे. तब्बल १३ वर्षापासून प्रकल्पात ठणठणाट असून मालपूरसह परिसरातील ग्रामस्थांना तापीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.येथील अमरावती मध्यम प्रकल्प हा धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेवर शिंदखेडा तालुक्याच्या पूर्वेला अमरावती व नाई नदीवर मालपूर गावाजवळ बांधलेला मध्यम प्रकल्प आहे. शासन निर्णयानुसार १९७९ अन्वये ३५८.१४ लाख किंमतीस मुळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यास १९९५ मध्ये २८७६.९१८ लक्ष किंमतीस सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. सन १९९९-२००० दरसूची नुसार ४८३३.७५ लाख किंमतीचा सु-सुधारीत प्रकल्प अहवालास शासन निर्णयानुसार २००१ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे.एवढा पैसा खर्च करुन एक अपवाद वगळता गेल्या १२ वर्षापासून मृतसाठा क्षमता देखील ओलांडलेली नसून एक थेंब सिंचनासाठी उपयोगी आलेला नाही.हा प्रकल्प १९८० मध्ये रो.ह. योजना अंतर्गत सुरू करण्यात येवून गावातीलच मजुरांनी याचा पाया खोदल्यामुळे या प्रकल्पाची गावाची विशेष नाळ जुळलेली आहे. प्रत्यक्ष पाया खोदकाम करणारे काही मजूर आजही हयात असून साक्षीदार आहेत, प्रत्यक्ष पूर्ण क्षमतेने कायमस्वरुपी पाण्याचा साठा पाहण्याचे त्यांचे स्वप्न मात्र पूर्णत्वास आलेले नाही.तब्बल २६ वर्षानंतर सन २००६ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास आला. शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, परिसर सुजलाम सुफलाम होईल, परिसराला दुष्काळाचा लागलेला कलंक मिटेल असे वाटले. झालेही तसेच सुरुवातीलाच २००६ मध्ये पहिल्याच वर्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यातून पाणी सोडण्याची आपतकालीन परिस्थिती उद्भवली यानंतर मात्र आजतागायत हा प्रकल्प पूर्णक्षमतेने तर सोडा मात्र मृतसाठा क्षमता देखील ओलांडू शकला नसल्याचे दिसून आले आहे.या अमरावती मध्यम प्रकल्पात मालपूर गावासह मालखंड, वैंदाणे, मोयाने आदी भागातील शेतकºयांची सुपीक व कसदार ५५३.४० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात गेलेली आहे. जमीनही गेली आणि प्रकल्पात पाणीही नाही. म्हणून हा प्रकल्प या भागातील शेतकºयांसाठी शाप की वरदान? हा प्रश्न या शेतकºयांना पडतो.अमरावती मध्यम प्रकल्पाला एकूण ७२६.६० हेक्टर जमीन लागलेली असून त्यापैकी ६७१.३४ हेक्टर खासगी असून ५५.२६ हेक्टर सरकारी जमीन आहे. या प्रकल्पात वनजमिनीचा समावेश दिसून येत नाही. तसेच बुडीत क्षेत्रात एकही गाव आलेले नसून पूर्नवसन करावे लागलेले नाही. मात्र शेतकºयांची कसदार जमीन गेली व त्या मोबदल्यात आज पाणी नाही.यासाठी प्रकाशा-बुराई योजना असो का फोफाद्या धरणाच्या सांडव्यातून असो मात्र पाणी टाकणे गरजेचे आहे. त्याशिवाय येथील परिसर समृद्ध होणार नाही हे गेल्या १३ वर्षापासूनच्या आलेल्या अनुभवावरुन सिद्ध झाल्याचे परिसरातील शेतकºयांच्या चर्चेतून दिसून येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे