शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

देवपुरातील आरती सोसायटीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 22:02 IST

३६ हजाराचा ऐवज : पोलीस ठाण्यात गुन्हा

धुळे : देवपुरातील आरती सोसायटीत बंद घराचा फायदा घेत शनिवारी पहाटे घरफोडी करत ३६ हजाराचा ऐवज लांबविला़ यात सोन्याचे दागिन्यांसह गॅस सिलेंडर, शेगडीचा समावेश आहे़ घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे़भालेराव नगर अमळनेर येथे राहणाऱ्या रिता भुपेंद्र बाविस्कर या महिलेने देवपुर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, रिता बाविस्कर हिची आई आणि भाऊ यांचे धुळ्यातील देवपूर भागात आरती सोसायटी प्लॉट नंबर ७९ येथे वास्तव्य आहे़ ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ बंद घराचा फायदा चोरट्याने उचलला़ त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे स्कू्र काढून घेतले़ त्यानंतर दार अगदी सहज उघडून आतमध्ये प्रवेश केला़ संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत किचनजवळील लाकडी दरवाजाही तोडला़ चोरट्याने एचपी कंपनीचे दोन सिलेंडर व एक गॅस शेगडीसह एक तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि १३ हजार ७०० रुपये रोख असा एकूण ३६ हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़घरफोडीची ही घटना शुक्रवार १० एप्रिल रोजी रात्री १० वाजेपासून ते शनिवार ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली़ आई आणि भाऊ घरी आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याप्रकरणी देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली़ याप्रकरणी रविवार १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस हेड कॉन्स्टेबल ए़ बी़ चिंचोलीकर घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे