शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात गंभीर जखमी झाल्याने लग्नाआधीच वाग्दत्त वधूचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:03 IST

२० रोजी होता विवाह : वाघाडीनजिक घटना, जुने भामपुरात हळहळ

शिरपूर/कापडणे : शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावानजिक दोन दुचाकीच्या अपघातानंतर रस्त्यावर फेकली गेलेली वाग्दत्त वधू ट्रकखाली आली़ त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली़ तिला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू ओढवला़ अपघाताची ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, धुळे तालुक्यातील कापडणे येथील तरुणासोबत तिचा २० नोव्हेंबर रोजी धुळ्यात विवाह होणार होता़ तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़ शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथील शेतकरी मुरलीधर नाना पाटील-बोरसे यांची द्वितीय कन्या वैशाली उर्फ कादंबरी हिचा विवाह २० रोजी कापडणे येथील  प्रा़ चेतन उर्फ सचिन मनोहर पाटील-भामरे यांच्याशी धुळ्यातील हिरे मंगल कार्यालयात  होणार होता़ तत्पूर्वी १९ रोजी हळद व साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता़ त्यासाठी वाग्दत्त वधू वैशाली तिचा लहान भाऊ राकेश मुरलीधर पाटील (२०) व मावशीची मुलगी काजल रविंद्र पाटील (१८) असे तिघे जण एमएच १८ एबी ९९७८ या क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूरकडे साखरपुडा, विवाह सोहळ्यासाठी लागणाºया काही वस्तू घेण्यासाठी निघाले होते़ सकाळी १० वाजेच्या दरम्यान मार्गावरील वाघाडी गावानजिक असलेल्या आऱसी़ पटेल सीबीएसई स्कूलसमोर ओव्हरटेक करुन येणारी जीजे ५ ईक्यू २८७८ या क्रमांकाची दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली़ त्या मुळे राकेश व काजल हे रस्त्यावर बाजूला तर वैशाली ही रस्त्यावर फेकली गेली़ तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्याचवेळेस भरधाव वेगाने जाणाºया ट्रकच्या खाली ती आल्याने गंभीर जखमी झाली़ तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र मार्गावरच तिचा  मृत्यू ओढवला़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात