धुळे - पालखीतून विसर्जन मिरवणुकीस पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय मंदिराच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे येथील गणपतीचे विसर्जन पुढच्या वर्षी होणार आहे. दरवर्षी खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक खुनी मशीदसमोर आल्यानंतर मशिदीवरून पुष्पवृष्टी करण्यात येते. मशिदीच्या मौलनांच्या हस्ते पूजा केली जाते. मात्र १५५ वर्षाची ही परंपरा यंदा खंडित झाली आहे.
धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीची १५५ वर्षाची परंपरा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 22:30 IST