शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

धुळे तालुक्यात नेर येथील जैन मंदिरात धाडसी चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 4:29 PM

दागिने रोकडसह लाखोचा ऐवज लंपास

ठळक मुद्देमहामार्गावरील गावात शनिवारी मध्यरात्रीची घटनाचोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून केला मंदिरात प्रवेश दागिन्यांसह रोख पैसे लांबविल्याचे स्पष्ट, गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू  

आॅनलाइन लोकमतनेर (जि.धुळे) : येथील भरवस्तीत असलेल्या जैन गल्लीतील जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज शनिवारी मध्यरात्री चोरून नेला. सोने, चांदीचे दागिने तसेच दानपेटीत असलेले पैसे असा एकूण लाखोचा ऐवज लांबविण्यात आल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्रीची गस्त घातली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धुळे तालुक्यातील नेर हे ५० हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. नेरसह पंचक्रोशीतल्या गावांसाठी येथे दूरक्षेत्र पोलीस चौकी आहे. मात्र तेथे पुरेसे पोलीस कर्मचारी नाहीत. आहेत त्या कर्मचाºयांकडून समन्स बजावण्यातच वेळ जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळेच चोरट्यांनी भरवस्तीतील जैन मंदिरात चोरी करण्याचे धाडस केले आहे. रविवारी नेहमीप्रमाणे मंदिराची स्वच्छता करण्यासाठी सकाळी मंदिर उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून वाहनाने पसार झाल्याचा कयास आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील काही कॅमेरे चोरट्यांनी फोडले. एक कॅमेरा वरच्या बाजूने  करुन दिला. मात्र दानपेटी जवळचा कॅमेरा चोरट्यांना दिसला नाही. त्यामुळे चोरटे या कॅमºयात कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सकाळी ११ वाजता भेट दिली. त्यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. तसेच नाकाबंदी करण्याच्या सूचना देत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची दिशा ठरवण्याचे आदेश दिले.                   चोरट्यांचा मंदिरात मुख्य दरवाजातून प्रवेश  मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांनी दुसरा दरवाजा तोडला आहे. भिंतीत असलेले कपाट काढून ते फोडले आणि त्यातून दागिने लांबवले आहेत.   ‘रेकी’ करूनच चोरीचे धाडस चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या पद्धतीवरुन असे लक्षात येते की आधी मंदिराची त्यांनी रेकी केली आहे. त्यानंतरच चोरट्यांनी चोरीचे धाडस केले आहे. मंदिरातील दागिने आणि पैसे ठेवलेल्या कपाटाची त्यांना पूर्ण माहिती होती. त्याच्या आधारेच त्यांनी मंदिरात चोरी केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.    दूरक्षेत्राचे पोलीस ठाण्यात रूपांतर करा नेर येथे पोलीस दूरक्षेत्र असूनही धाडसी पद्धतीने चोºया होतात, त्यावरून चोरांची मुजोरी वाढल्याचे स्पष्ट होते. नेर येथे महामार्गावर कॅनव्हाय पॉर्इंट  लावावा. तसेच रात्रीची गस्त व पेट्रोलिंग व्हॅन रात्री परिसरात फिरवावी. नेर येथील दूरक्षेत्र पो.स्टे.चे रुपांतर पोलीस ठाण्यात करावे, अशी मागणी येथील सरपंच शंकरराव खलाणे यांनी केली.

 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा