पहिल्याच दिवशी नवागतांमध्ये पुस्तकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:26 PM2019-06-19T22:26:28+5:302019-06-19T22:27:14+5:30

विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह

Book attraction in newcomers on the very first day | पहिल्याच दिवशी नवागतांमध्ये पुस्तकांचे आकर्षण

dhule

Next

धुळे : विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दोन दिवसांपूर्वीच शाळा सज्ज झाल्या होत्या. सकाळी ७ वाजता पहिली घंटा होताच शाळाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. दरम्यान शाळेच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी वाजंत्री लावून, तर काही ठिकाणी गुलाबपुष्प देवून स्वागत झाल्याने, विद्यार्थीही भारावले होते. पहिल्याच दिवशी नवी पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थी भारावरुन गेले होते. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साह दिसून येत होता.
मालपूर
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत व गणवेश वाटप, पुस्तक वाटप, दप्तर करण्यात आले. पहिल्याच दिवशी गावात प्रभात फेरी काढण्यात आली व नविन विद्यार्थ्यांचे स्वागताचा कार्यक्रम महाविरसिंह रावल यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमास लोकनियुक्त ग्रामपंचायत सरपंच मच्छिंद्र शिंदे, श्रावण अहिरे, व्याघ्रंबरी दूध संस्थेचे अध्यक्ष पोपट बागुल, मगन बागुल, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विविध सस्थांचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविरसिंहजी रावल यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक व्ही.डी. कागणे यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात नविन कोणते उपक्रम शाळेत राबवले जातील या विषयी माहिती दिली. यावेळी शाळेचे उपमुख्याध्याप आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी.सूर्यवंशी, ग्रंथपाल प्रमोद राजपूत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बैलगाड्यावरून मिरवित
विद्यार्थ्यांचे स्वागत
कापडणे - येथील नवजीवन विद्या विकास मडळ संचलीत आदर्श माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाड्यावरून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. शाळेत देखील पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
यावेळी नवजीवन विद्या विकास मडळाचे अध्यक्ष शशीकात भदाणे, मुख्याध्यापिका उषा पाटील, रमेश भदाणे, खजिनदार अक्षय भदाणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र मोरे, भिमराव कुंभार आदि उपस्थित होते. ग्रा.प.चौकातून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. त्या नंतर विद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी इ.१० वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यासाठी मुख्याध्यापिका उषा पाटील,एम.पी. पाटील, आर.के. पाटील, बी.एन. पाटील, वाय.आर. पाटील, स्वाती भदाणे, नरेंद्र पाटील, जिजाबराव माळी, माधुरी भदाणे, कमलेश देसले, अमोल अवारे, साहेबराव पाटील, मधुकर वाडीले, भुषण पाटील आदिंनी परिश्रम घेतले.
शिरपूर
अहिल्यापूर- येथील आर.सी. पटेल विद्यालयात नवागताचे स्वागत, शाळा शुभारंभ व पुस्तक वाटप झाले़़ यावेळी सरपंच संग्रामसिंग राजपूत, प्राचार्य आर.बी.भदाणे, पी.के. पाटील उपस्थित होते.
खर्दे- येथील आऱसी़पटेल प्राथमिक शाळेत प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सजवलेल्या बैलगाडीत बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बसून गावात बँडच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या बैलगाड्यांवर बसून चिमुकले मोठ्या आनंदाने गावभर मिरवणूकीत सामील झाले होते. तसेच शाळेला फुग्यांनी तसेच वेगवेगळ्या रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी रिशा पटेल, सरपंच सरिताताई गुजर, रंजना शर्मा, स्मिता महांते, विजय पटेल, मुख्याध्यापक प्रदीप गहीवरे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशीला मराठे, वसंत भामरे, छाया पाटील, अनिल माळी, विजय गुजर, शरद गुजर यांनी मेहनत घेतली.
टेकवाडे- येथील आऱसी़पटेल प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व तीलक करून सजवलेल्या बैलगाडीतून गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सोबत शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती बाबत व शैक्षणिक जनजागृती केली. यावेळी सरपंच संजय धनगर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलाल पटेल, उपाध्यक्ष शांतीलाल भलकार, संतोष ढोले, श्रीकृष्ण वाडीले, दाजभाऊ राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत, सुकलाल दावडे, भारती वाडीले उपस्थित होते.
यावेळी पहिलाच दिवस गोड व्हावा म्हणून मिष्ठान्न भोजन देण्यात आले़ शाळेचे मुख्याध्यापक बी.आर. महाजन यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन आर.पी.कुलकर्णी यांनी केले.

Web Title: Book attraction in newcomers on the very first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे