नोटबंदीचा आजही व्यापारावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:13 IST2019-11-09T13:12:44+5:302019-11-09T13:13:35+5:30
तीन वर्ष पूर्ण : व्यापाऱ्यांचे मत

dhule
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये देशातील हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाचा आजही व्यापार उद्योगावर परिणाम होत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केले.
काही काळ होता परिणाम
तीन वर्षापुर्वी केंद्र सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय घेतला होतो़ त्यामुळे काही काळ लोकांमध्ये नाराजी होती़ आता मात्र व्यापार, उद्योगात कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ नोटाबंदीचा विषय काही लोक उकरून काढत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे़
- अरूण नावरकर
(किराणा व्यापारी असोसिएशन)
आजही व्यापारावर परिणाम
केंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णय आजही व्यापारावर जाणवत आहे़ नोट बंदीचा निर्णय व्यापाºयांचा समर्थनार्थ नव्हता़ त्यामुळे तीन वर्षानंतरही त्याचा परिणाम व्यापार उद्योगावर दिसत आहे़ बाजारपेठ स्थिर होण्यासाठी किमान तीन ते चार वर्ष लागू शकतात़
-राजेश गिंंदोंडिया
(व्यापारी महासंघाचे सचिव)
अर्थव्यवस्थेवर परिणाम
केंद्र नोटबंदीला तीन वर्षपुर्ण होत आह़े़ निर्णय झाल्यावर देखील जाणकारांनी नोटबंदीच निर्णय चुकीचा होता़ व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो़ अशी शक्यता वर्तविली होती़ त्यामुळ आज अर्थव्यवस्थेला मरगळ आलेली दिसते़
-एस़ वाय़ बच्छाव
(सेवानिवृत्त प्राध्यापक)
काही काळ होता परिणाम
व्यापार किंवा उद्योगावर नोटबंदीचा तीन वर्षापासुन कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ उलट व्यापार व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सर्वसामान्य व्यक्तीवर तर काहीच परिणाम झालेला नाही़ सध्या पावसामुळे बाजारात मंदीचे सावट आहे़
- सुभाष कोटेजा
(अध्यक्ष, असो. आॅफ बिझनेस अॅन्ड कॉमर्स )
नोटबंदीचा निर्णय योग्य
नोटबंदीच्या काळात एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा बंद होत्या़ त्यामुळे इतर नोटा चालु असल्याने उद्योग, व्यापारी किंवा व्यवसायावर काहीही परिणाम झाला नाही़ उलट नोटबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाईन बॅर्किगव्दारे उद्योग व व्यापारात भर पडली़
-अजय नाशिककर
(उद्योजक)
अर्थव्यवस्थेवर परिणाम
केंद्र सरकारने देशातील काळा पैसा काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता़ यानिर्णयाने फायदा होईल असे वाटत होते़ मात्र नोटबंदीचा फटका सर्वसामान्य व्यक्तीपासून तर उद्योगावर देखील झालेला दिसून आला़ त्यामुळे आजही देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसतो़
-धिरज पाटील
(व्यापारी)