भूमिगत गटारींचे काम करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करा : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी विशेष सभा बोलवून निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:42+5:302021-05-07T04:37:42+5:30

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम अगदी धिम्या गतीने सुरू आहे. योजनेचे काम नियमाप्रमाणे होत नाही. त्यामुळे एमजीपीच्या अधिकाऱ्यास बैठकीस बोलवावे. ...

Blacklist the contractor working on the underground sewers: Standing Committee meeting will decide the demands of the members by calling a special meeting. | भूमिगत गटारींचे काम करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करा : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी विशेष सभा बोलवून निर्णय घेणार

भूमिगत गटारींचे काम करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करा : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी विशेष सभा बोलवून निर्णय घेणार

Next

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम अगदी धिम्या गतीने सुरू आहे. योजनेचे काम नियमाप्रमाणे होत नाही. त्यामुळे एमजीपीच्या अधिकाऱ्यास बैठकीस बोलवावे. जेणेकरून त्यांना योजनेच्या कामात येणाऱ्या अडचणी समजतील. तसेच या कामाच्या ठेकेदारालासुद्धा काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक अमिन पटेल यांनी केली.

चालणे कठीण - देवपुरातील रस्त्याची परिस्थिती खूपच खराब झाली आहे. सुदैवाने महाविद्यालय आणि शाळा बंद असल्याने अपघात झाला नाही. नाहीतर रोज अपघात झाले असते. भूमिगत गटारींच्या कामाच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याच्याकडून काम करवून घ्यावे, असे नगरसेवक शीतल नवले म्हणाले. तसेच एमजीपीच्या अधिकाऱ्यास पुढील सभेला बोलाविण्याचे आदेश दिले.

नगरसेविकेची तक्रार - नगरसेविका पुष्पा बोरसे यांनी वारंवार लेखी तक्रार करूनही प्रभागातील गळतीची दुरुस्ती केली जात नाही. प्रभागात अवैध नळ कनेक्शन दिले जात असल्याचीही तक्रार केली. तेव्हा सभापती जाधव यांनी ही बाब गंभीर आहे. या संदर्भात त्वरित कारवाई करावी, असे आदेश दिले.

लसीकरणासंदर्भात बोलताना नगरसेवकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळत नाही. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना लस प्राधान्याने द्यावी, याकडे लक्ष दिले जाईल, असे सभापतींनी सांगितले.

Web Title: Blacklist the contractor working on the underground sewers: Standing Committee meeting will decide the demands of the members by calling a special meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.