शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 15:30 IST

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीशी केलेल्या युतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाली असून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याच म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा निशाणा साधला आहे. 

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळ्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षश्रेष्ठी जोपर्यंत हिरवा कंदील देणार नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. 

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्यासंदर्भात विचारणा झाली असता, आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत असून सध्या भाजपाकडून कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा उघडपणे जाहीर करण्यात आला नसून, एबी फॉर्म देखील देण्यात आलेला नाही व याबाबत दोन दिवसात पक्षश्रेष्ठींसोबत बोलून निर्णय स्पष्ट होईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या वेगाने प्रगती करत असल्याचे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार