बोराडी येथे गाव प्रवेशद्वार कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:38 IST2019-11-08T22:37:10+5:302019-11-08T22:38:01+5:30
गावाची शान वाढणार : १५ लाख रुपयांचा निधी मंजूर; पाठपुराव्याला मिळाले यश

dhule
शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील नवीन प्रवेशद्वाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला. त्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी पाठपुरावा केला.
५ रोजी बोराडी येथील मातोश्री बनुमाय रंधे दरवाजाजवळ या नवीन गाव दरवाज्याचे भूमिपूजन माजी जि़प़सदस्य डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, सरपंच सुरेखा पावरा, बन्सिलाल बंजारा, शिवाजीराव पाटील, शालीकराव पाटील, मोहन महाजन, मधुकर पाटील, न्हानु भिल, मगन पवार, गुलाब मालचे, डॉ.भास्कर पाटील, डॉ.दिलिप पाटील, डॉ.सुरेश देसले, ज्ञानेश्वर पाटील, डॉ.बाळासाहेब पाटील, शामकांत पाटील, सुकदेव मालचे, शशांक रंधे, डॉ.अजित पाटील, रंगराव पाटील, डॉ.सुभाष बडगुजर, भिवा भिल, उत्तम भिल, युवराज भिल, निंबा पाटील, भगवान आदी उपस्थित होते.
बोराडी गावाच्या सुरुवातीस शिरपूर-बोराडी रस्त्यावर असलेल्या या कामासाठी लेखाशीर्ष २५/१५ इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत १५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. मोठ्या शहरातील प्रवेशद्वारसारखे भव्य काम असल्याने बोराडी परिसरात आनंद व्यक्त होत आहे.