शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:16 IST

आदिवासी विकास मंत्री : आदिवासी विकास विभागाशी संबंधित कार्य करणाऱ्या यंत्रणांची बैठक

धुळे : वनहक्क कायद्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांना वनपट्टे मिळाले आहेत, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी दिले.तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील ११ लाख ५५ हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड़ के़ सी़ पाडवी यांनी प्रशासनाला दिल्या़तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी भरावयाचे शुल्क हे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून संबंधित यंत्रणेला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिधापत्रिकेसाठी पात्र कुटुंबांचा लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शोध घेत त्यांना शिधापत्रिका मिळवून द्याव्या, असे आदेशही त्यांनी दिले़ मंत्री पाडवी सोमवारी धुळे जिल्हा दौºयावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे आदी उपस्थित होते.मंत्री अ‍ॅड़ पाडवी म्हणाले, धुळे जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी त्या भागात उपलब्ध होणारे अन्नधान्य जसे भगर, वरई, नाचणीचा आहारात वापर वाढवून कुपोषणाची तीव्रता कमी करावी. तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायांचे सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत. ‘पेसा’ अंतर्गत भरती करावयाच्या उमेदवारांमध्ये या क्षेत्रातील उमेदवार मिळाला नाही, तर संबंधित पद हे आरक्षित ठेवावे.वाटप झालेल्या वन जमिनींच्या क्षेत्रात तफावतवनपट्टे वितरीत करताना प्रमाणपत्रावरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशाही सूचना मंत्री पाडवी यांनी दिल्या़ या बैठकीत आदिवासी जमातीसाठीच्या योजनांची अंमलजावणी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पोषण आहार योजना, रोजगार निर्मिती, खावटी अनुदान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. आमदार पावरा, आमदार गावित, माजी आमदार डी. एस. अहिरे आदींनी विविध सूचना केल्या.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ द्याआदिवासी विकास मंत्री : आदिवासी विकास विभागाशी संबंधित कार्य करणाऱ्या यंत्रणांची बैठकधुळे : वनहक्क कायद्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांना वनपट्टे मिळाले आहेत, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी दिले.तसेच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील ११ लाख ५५ हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड़ के़ सी़ पाडवी यांनी प्रशासनाला दिल्या़तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी भरावयाचे शुल्क हे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून संबंधित यंत्रणेला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिधापत्रिकेसाठी पात्र कुटुंबांचा लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शोध घेत त्यांना शिधापत्रिका मिळवून द्याव्या, असे आदेशही त्यांनी दिले़ मंत्री पाडवी सोमवारी धुळे जिल्हा दौºयावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे आदी उपस्थित होते.मंत्री अ‍ॅड़ पाडवी म्हणाले, धुळे जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी त्या भागात उपलब्ध होणारे अन्नधान्य जसे भगर, वरई, नाचणीचा आहारात वापर वाढवून कुपोषणाची तीव्रता कमी करावी. तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायांचे सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत. ‘पेसा’ अंतर्गत भरती करावयाच्या उमेदवारांमध्ये या क्षेत्रातील उमेदवार मिळाला नाही, तर संबंधित पद हे आरक्षित ठेवावे.वाटप झालेल्या वन जमिनींच्या क्षेत्रात तफावतवनपट्टे वितरीत करताना प्रमाणपत्रावरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशाही सूचना मंत्री पाडवी यांनी दिल्या़ या बैठकीत आदिवासी जमातीसाठीच्या योजनांची अंमलजावणी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पोषण आहार योजना, रोजगार निर्मिती, खावटी अनुदान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. आमदार पावरा, आमदार गावित, माजी आमदार डी. एस. अहिरे आदींनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :Dhuleधुळे