शेतीच्या वादावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:59+5:302021-05-21T04:37:59+5:30
तरुणाला मारहाण धुळे : महिलेला न नांदविण्याच्या कारणावरून वाद सुरू असताना आपापसात मिटवून घ्या, असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला दगडाने ...

शेतीच्या वादावरून मारहाण
तरुणाला मारहाण
धुळे : महिलेला न नांदविण्याच्या कारणावरून वाद सुरू असताना आपापसात मिटवून घ्या, असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला दगडाने मारहाण केल्याची घटना धुळे तालुक्यातील नाणेगावात रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. हाताबुक्क्यांनीही मारहाण केल्याने संतोष दिलीप ढिवरे जखमी झाला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शंकर रतन मोरे, रोशन नाना बनसाेडे, मसू नाना बनसोडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गुरांचा टेम्पो पकडला
धुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील कममाडी गावाच्या फाट्याजवळ पोलिसांनी एमएच १८ एए ३०३८ क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी अडविला. त्याची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आली. गुरांसह टेम्पो असा एकूण ७१ हजारांचा मुद्देमाल नरडाणा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांना पाहून चालकाने पळ काढला असून त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली.