शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST

धुळे : कोरोनाच्या संसर्गात गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील सलूनची दुकाने बंद झाल्याने महिनाभर दाढी-कटिंग घरातच करण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. ...

धुळे : कोरोनाच्या संसर्गात गेल्या वर्षाप्रमाणे यंदादेखील सलूनची दुकाने बंद झाल्याने महिनाभर दाढी-कटिंग घरातच करण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. सध्या ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंदच आहेत. त्यानंतरही दुकाने सुरू होतात किंवा नाही याबाबत शंका आहे. कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला, तर दुकाने बंदच राहतील, अशी शक्यता आहे.

सर्वसामान्यांनी महिने-दोन महिने दाढी-कटिंग केली नाही तरी त्यांचे काही नुकसान होणार नाही; परंतु या मिनी लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका सलून व्यावसायिक आणि कामगारांना बसणार आहे.

धुळे शहरात अडीचशेपेक्षा अधिक सलून दुकाने आहेत. कुटुंबातील दोन जणांनी मिळून दुकाने सुरू केली आहेत. शिवाय प्रत्येक दुकानात एक किंवा दोन कामगार आहेत. म्हणजे एका दुकानावर तीन ते चार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात नियमांचे पालन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार दुकानदार नियमांचे पालन करीत होते. त्यामुळे दुकाने बंद करण्याची गरज नव्हती, असे संघटनांचे मत आहे.

भाडे निघणेही होत आहे अवघड

सलूनच्या व्यवसाय करणाऱ्या अनेकांची दुकाने भाडेतत्त्वाच्या गाळ्यांमध्ये आहेत. दुकाने बंद झाल्याने आता उत्पन्नदेखील बंद झाले आहे. भाडे निघणेही कठीण आहे. दुकानाचे भाडे कसे द्यावे, असा प्रश्न त्यांना सातत्याने सतावत आहे.

गेल्या वर्षी लाॅकडाऊनमध्ये तीन ते चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे आर्थिक घडी विसकटली होती. आता कुठेतरी व्यवसाय सुरळीत झाला. पुन्हा दुकाने बंद झाल्याने उपासमारीची वेळ येणार आहे.

-नंदकिशोर सोनवणे, सलून दुकानदार

दाढी-कटिंग हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय आम्ही करू शकतो. दुकाने बंद झाल्याने दुसरा व्यवसाय करणे शक्य नाही. कारण इतर व्यवसायची जाण नाही. आम्ही जगायचे कसे.

-पोपट सूर्यवंशी, सलून दुकानदार

सलूनचा व्यवसाय करून पोट भरण्यासाठी धुळ्यात आलो आहे. भाडेतत्त्वाच्या दुकानात छोट्या भांडवलावर व्यवसाय सुरू केला. गेल्या वर्षी दुकाने बंद झाली तेव्हा कर्जबाजारी झालो. आता पुन्हा तीच वेळ आमच्यावर आली आहे.

-विजय पवार, भाडेतत्त्वाचे दुकान

गेल्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंसह इतरही व्यवसायांना परवानगी मिळाली होती; परंतु सलून दुकाने सुरू करण्यासाठी संघटनांना संघर्ष करावा लागला. यावेळीदेखील तशीच परिस्थिती आमच्यावर आली आहे. दुकाने बंद झाल्याने दुकानदारांसह कामगारांचादेखील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

-भटू सूर्यवंशी, संघटनेचे पदाधिकारी

शहरात एकूण केश कर्तनालये - २३२

भाडेतत्त्वाच्या दुकानांची संख्या - १३८