मालपूरमध्ये बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:15+5:302021-03-15T04:32:15+5:30
यामुळे नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवा मारोती चौक, भवानी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

मालपूरमध्ये बंदला प्रतिसाद
यामुळे नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेले बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवा मारोती चौक, भवानी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणी दिवसभर शुकशुकाट दिसून आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोना साखळी तोडण्यासाठी उत्तम प्रतिसाद दिल्याचे यावरून दिसून आले.
गावात पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलाही बंदोबस्त दिसून आला नाही.
मालपूर गावात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना नियमांचे पालन गावातील ग्रामस्थ व गावात येणारे खेड्यापाड्यातील कोणीही करतांना दिसून येत नाहीत. विनामास्क पायी व दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. तसेच गावात मागील आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे संपूर्ण गाव बाधित होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे केवळ बाधित क्षेत्रात तूटपुंजी फवारणी करुन भागणार नाही. यासाठी संपूर्ण गावात फवारणी करुन कोरोनाला हलक्यात न घेता ग्रामपंचायत व कोविड समितीने प्रभावी उपाययोजना करुन कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कारण पाच टक्के नागरिकांमुळे संपूर्ण गावाला धोका नको, यासाठी कठोर निर्णय यापुढे घ्यावेत. अशी काल नागरिकांनी घरात स्वतः व कुटुंबाला कैद करुन सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा केली.