शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

बाम्हणे सील, धुळ्यात ड्रोन ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 22:49 IST

धुळे/दोंडाईचा/कापडणे : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे ७० वर्षीय महिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा भाग म्हणून बाम्हणे ...

धुळे/दोंडाईचा/कापडणे : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे ७० वर्षीय महिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा भाग म्हणून बाम्हणे केंद्रबिंदू मानून त्यास कन्टेन्मेट एरिया जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार 3 किमी पर्यंत सील करण्यात आले असून बाम्हणेस लागून असलेले 5 किलोमीटर परिघातील क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.या क्षेत्रातील बाम्हणे गावासह पाच गावात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली़बाम्हणे येथील ७० वर्षीय महिला कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे. या घटनेनंतर बाम्हणेसह परिसरातील सर्वच गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाम्हणे केंद्रबिंदू घोषित करून ३ किलोमीटर अंतरावरील बाम्हणेसह धमाणे, लंघाणे कन्टेन्मेट क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तर ५ किलोमीटर क्षेत्रातील भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बफर झोन मध्ये जुने कोळदे, कुरुकवाडे या गावाचा समावेश आहे. या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी असून या क्षेत्रात प्रवेश करणे-बाहेर जाणे यास संपूर्ण बंदी आहे. या क्षेत्रातील सर्व घराचे सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी यांचा देखरेख खाली होत आहे. सर्व नियुक्त क्षेत्रीय अधिकारी घरांना भेट देऊन अहवाल नोडल अधिकाऱ्यांना पाठविणार आहेत. वैद्यकीय पथक संशयास्पद रुग्णाचे दैनंदीन परीक्षण करणार आहेत. या कामी १४ तपासणी पथक कार्यरत करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात एक आरोग्य अधिकारी, शिक्षक व होमगार्ड यांची नेमणूक केली आहे. टीमला मदत म्हणून तलाठी आर.डी.पवार व कोतवाल असतील. बाम्हणे गावात तात्काळ जंतुनाशक फवारणीस सुरुवात करण्यात आली आहे.मंगळवारी रात्री प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड आदींनी बाम्हणे गावास भेट दिली.उपजिल्हा रुग्णालयातील ११ कर्मचारी क्वारंटाईनसदर महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करतांना संपर्कात आलेल्या ११ कर्मचाऱ्यांना रोटरी स्कुलमध्ये स्थापन क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललीतकुमार चंद्रे यांनी दिली.याशिवाय महिेलेच्या घरातील पाच जणांना वैद्यकीय तपासणी करिता हिरे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे़ त्यापार्श्वभुमीवर तिरंगा चौकासह प्रशासनाकडून प्रतिबंधीत केलेल्या परिसरात आता ड्रॉन कॅमेºयाची नजर राहणार आहे़ याकरीता दोन ड्रोन कॅमेºयांची मदत घेण्यात येणार आहे़ बुधवारी ड्रोन कॅमेºयांची मदतीने आझाद नगर पोलिस ठाण्याच्या छतावरून पतिबंधीत क्षेत्रात टेहळणी करण्यात आली़ यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिन हिरे, दिनेश आहेर उपस्थित होते़ दरम्यान दुपारी ३ वाजता कॅमेºयांची पाहणी करण्यात आली़ कॅमेºयांत आधाराव बाहेर फिरणारे व नियम तोडणाºयावर कठोर कारवाई केली जाणाा आहे़कापडणे गाव लॉकडाऊनचा ठेवण्याचा निर्णयजिल्ह्यात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर धुळे तालु्क्यातील कापडणे गाव येथे २२ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून ते २४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण 'लॉकडाऊन' करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अचानक मोठ्या संख्येने कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन येथे संपूर्ण संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. परस्पर संपकार्मुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून ग्रामस्थाच्यावतीने संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे़ यावेळी सरपंच प्रतिनिधी प्रमोद पाटील, नवल पाटील, अमोल पाटील, धनराज पाटील, बापु महाराज, नरेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, दिपक पाटील, विठोबा माळी, ललित बोरसे, ज्ञानेश्वर बोरसे, चंदु पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, महेश पाटील आदी उपस्थित होते.अन्यथा होईल कारवाईयात कोणत्याही व्यक्तीला रस्त्यांवर, सार्वजनिक चौकात, गल्लीत, संचार करणे वा वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे, कोणतीही वस्तू विकणे या सर्व गोष्टी करता येणार नाहीत. यात केवळ वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने, दूध व रेशन दुकान ही वगळता सर्व दुकाने बंद राहतील.

 

टॅग्स :Dhuleधुळे