बसस्थानकात पोस्टद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:14 IST2020-01-11T23:13:45+5:302020-01-11T23:14:01+5:30
रस्ता सुरक्षा अभियान । जनजागृतीसाठी विविध उपक्रमावर भर

Dhule
धुळे : वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून ३१वा रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त शनिवारी बसस्थानक परिसरात पोस्टद्वारे नागरिकांना रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे़
राज्यात रस्ते सुरक्षा सप्ताह ११ ते १७ जानेवारी या कालावधीत सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे़ त्यानिमित्त शाळा, महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, महिला दुचाकी स्वारांची रॅली असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे़ शनिवारी या सप्ताहाचे उदघाटन बसस्थानक आवारात करण्यात आले़ यावेळी शहर वाहतूक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, श्रीकांत पाटील, पोलीस मुखतार मन्सूरी, विलास पाटील, पंकज खैरमौडे, भूषण खेडकर आदी उपस्थित होते़
याप्रसंगी उपासे म्हणाले की, वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन नियमित पणे केल्यास आपला व समोरच्या चालकाचा जीव वाचवता येवू शकतो़ नियमांचे पालन होत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असेही पोलीस निरीक्षक उपासे यांनी सांगितले़