सप्तश्रृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:26 IST2020-02-25T23:26:08+5:302020-02-25T23:26:31+5:30

वर्धापन दिन : मिस इंडीया रेशमा लोखंडे यांना महाराष्ट्र भूषण

Award by the Seven Wings Multipurpose Organization | सप्तश्रृंगी बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुरस्कार

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले़
मिस इंडीया रेशमा लोखंडे यांना महाराष्ट्र भूषण आणि दिलीप जगताप, रमेश चौधरी, अ‍ॅड़ शामकांत पाटील, शिवाजीराव मराठे, सोमनाथ गुरव यांना जवीन गौरव पुरस्कार प्रदान केला़ तर कविता बिरारी, संदीप पाटोळे, जगन ताटके, डॉ. अजय सोनवणे, दत्तात्रय कल्याणकर,विलास पवार, अरुण  पवार, राजेश सोनार, गजेंद्र पाटील, रामचंद्र जाधव, घनश्याम निरगुर्डे, मनीषा डियलानी, जगदीप दादा देवपूरकर, भानुदास बगदे , किरण पाटील ,चेतन पाटील, राजू पाटील अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानीत केले़ शैक्षणिक अनमोल रत्न पुरस्कार दिलीप पाटील यांना तर सामाजिक कार्य पुरस्कार संभाजी बिग्रेड ग्रुपला देण्यात आला़
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे होते़ जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, विक्रम सेन, शरद पाटील, एम. एस. शेख , रणजित राजे भोसले, पराग अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते़
समाजातील निराधार महिला, मुलांच्या सक्षमीकरणासह शेतकरी, आरोग्य, स्वयंरोजगार, पर्यावरण हे विषय घेऊन गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबविणाºया सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्ष मीना भोसले, संचालक हिरालाल भोसले यांनी अनोख्या पध्दतीने वर्धापन दिन साजरा केला़ ‘भरारी’ या संस्थेच्या कामकाजाची माहिती देणाºया विशेषांकाचे प्रकाशन झाले़

Web Title: Award by the Seven Wings Multipurpose Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे