कामगार न्यायालयात हजर रहा, जि़प़ च्या सीईओंना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:33 IST2020-01-14T22:33:01+5:302020-01-14T22:33:23+5:30

कामगार न्यायालय - प्रभावीपणे झाला युक्तीवाद

Attend labor court, order zip CEOs | कामगार न्यायालयात हजर रहा, जि़प़ च्या सीईओंना आदेश

कामगार न्यायालयात हजर रहा, जि़प़ च्या सीईओंना आदेश

धुळे : न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी व्यक्तीश: हजर आदेश कामगार न्यायालयाने पारीत केले आहे़ याकामी अ‍ॅड़ सुभाष पाटील यांनी युक्तीवाद केला़ त्यांना अ‍ॅड़चैतन्य बर्गे यांनी मदत केली़
येथील कामगार न्यायालयाने सतीष दिपचंद पाटील आणि दिलीप मंगा शिंदे या निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, गट विकास अधिकारी यांच्या विरुध्द प्रोसेस इश्यु करण्याचा नुकताच आदेश पारीत केला आहे़ पाटील आणि शिंदे हे दोन्ही सेवक जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होतेवेळी त्यांना नोकरीच्या काळात दिलेल्या वेतनवाढीचा लाभ शासन निर्णयाच्या आधारे जिल्हा परिषदेने काढून घेऊन त्यांच्या वेतनात घट केली़ त्यानुसार निवृत्तीचे फायदे लागू करण्यात आले़ तथापी ही कारवाई कामगार कायद्यातील तरतुदींचा भंग करणारी असल्यामुळे या दोघांनी धुळ्यातील औद्योगिक न्यायालयात अनुचित कामगार प्रथेच्या तक्रारी दाखल केल्या़ या तक्रारींचा गुणवत्तेवर न्यायनिवाडा करुन न्यायालयाने दोघांच्या तक्रारी मंजूर केल्या़ त्यांचे वेतन पुर्ववत करुन मागील थकीत वेतनाची भरपाई करुन देण्याचा आदेश पारीत केला़ मात्र, या निकालाप्रमाणे जिल्हा परिषदेने अंमलबजावणी करण्यास कसूर केला़ म्हणून या दोघांनी औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन केलेल्या गुन्ह्याविरुध्द धुळ्यातील कामगार न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली़
या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या औद्योगिक न्यायालयातील तक्रारीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व गट विकास अधिकारी यांना प्रतिवादी म्हणून सामील केले होते़ त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केल्यामुळे त्यांच्या विरोधात कामगार न्यायालयाने प्रोसेस इश्युचा आदेश पारीत केलेला आहे़
या कामी आरोपीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी़, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने, धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्र घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्षा घुगरे, शिंदखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश शिवदे यांचा समावेश आहे़ या सर्वांना २३ जानेवारी २०२० रोजी न्यायालयात व्यक्तीश: हजर राहण्यासाठी न्यायालयाने समन्सची बजावणी केलेली आहे़ यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे़ याकामी फिर्यादीतर्फे अ‍ॅड़ सुभाष बी़ पाटील यांनी युक्तीवाद केला़ त्यांना चैतन्य बर्गे यांनी मदत केली आहे़

Web Title: Attend labor court, order zip CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.