धुळ्यात लॉकअपमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:22 IST2019-01-29T13:22:22+5:302019-01-29T13:22:50+5:30
रुग्णालयात उपचार : तालुका पोलीस लॉकअपमधील घटना

धुळ्यात लॉकअपमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुका पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये प्रेम उर्फ दादा उर्फ विकास राजेंद्र पाटील (२२, रा़ कोडपिंप्री ता़ भडगाव जि़ जळगाव) या संशयित आरोपीने अंगावरील स्वेटरच्या कॅपला असलेली लेस काढून लॉकअपच्या लोखंडी ग्रीलला बांधून गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा सुमारास घडली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पोलीस कर्मचारी दिनेश नोपºया मावची यांनी सोमवारी रात्री साडेअकरा वाजता फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, प्रेम उर्फ दादा उर्फ विकास राजेंद्र पाटील याच्या विरोधात भादंवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एम़ डी़ खडसे घटनेचा तपास करीत आहेत़