सोनगीरला एकाला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:53 IST2020-01-18T12:52:57+5:302020-01-18T12:53:19+5:30

उसनवार पैशांचा वाद : तीन जणांविरुध्द गुन्हा

Attempt to burn Songhir to one | सोनगीरला एकाला जाळण्याचा प्रयत्न

सोनगीरला एकाला जाळण्याचा प्रयत्न

धुळे : उसनवार पैशांच्या वादातून एकाला मारहाण करीत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सोनगीरनजिक दोंडाईचा रोडवरील बसस्टेशनजवळील मोकळ्या जागेत १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी जखमी झालेला नंदु आधार पाटील (४१, रा़ चिंचगल्ली, सोनगीर) याने सोनगीर पोलीस ठाण्यात शनिवार १८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित घनश्याम नाना गुजर (रा़ सोनगीर) आणि त्याच्या सोबत अन्य दोन जण अशा तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोनगीर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Attempt to burn Songhir to one