भावाने भावाकडून विळ्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:26 IST2019-09-23T22:25:53+5:302019-09-23T22:26:24+5:30

बोरकुंड येथील घटना : जखमी भावावर रुग्णालयात उपचार

Attack with brother by brother | भावाने भावाकडून विळ्याने हल्ला

भावाने भावाकडून विळ्याने हल्ला

धुळे : सख्या भावाने भावावर विळ्याने हल्ला केल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात सोमवारी सकाळी घडली़ जखमी भावावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरुन रामदास उर्फ धाकल्या चिंतामण माळी याच्यावर विळ्याने हल्ला केल्याने त्याच्या पोटाला जबर दुखापत झाली आहे़ धाकल्या हा शेतात बाजरी कापण्यासाठी जात असताना ही घटना घडली़ रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत़ 
याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ गंगाधर चिंतामण माळी याने हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे़ 

Web Title: Attack with brother by brother