शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीने दिलेले १५ लाख मागितल्याने दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:17 IST

संशयित पद्नाभनगरचे : तालुका पोलिसात गुन्हा

धुळे : उसनवारीने दिलेले १५ लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील एकाला दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.धुळे तालुक्यातील बोरविहिर येथील पंकज दामू कदम या २८ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सुभाष दौलत पाटील आणि सुमीत सुभाष पाटील (दोघे रा.पद्नाभनगर, साक्री रोड, धुळे) यांना १५ लाख रुपये उसनवारीने दिलेले होते. त्यांच्याकडे दिलेले पैसे परत घेण्यासाठी वेळोवेळी मागणी केली, पाठपुरावा केला. पण, त्यांनी काही पैसे परत केली नाही. त्यांनी पैसे परत न करता उलट माझी एकप्रकारे फसवणूक केली आहे. त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिली. तसेच कायद्याला आम्ही जुमानत नसल्याचे सांगून उलट दमदाटी केली. त्यानुसार, सुभाष दौलत पाटील आणि सुमीत सुभाष पाटील या दोन्ही संशयितांविरुध्द फिर्याद दाखल केल्याने विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.