अरविंद इनामदारांचे होते धुळ्याशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:54 IST2019-11-08T22:54:31+5:302019-11-08T22:54:54+5:30

१९७१ मध्ये गाजविले होते दिवस : पोलीस अधीक्षक पदाचा दरारा आजही स्मरणात

Arvind Inamdar had a loan agreement with Dhule | अरविंद इनामदारांचे होते धुळ्याशी ऋणानुबंध

अरविंद इनामदारांचे होते धुळ्याशी ऋणानुबंध

धुळे : धुळ्याचे तत्कालिन पोलीस अधीक्षक, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे धुळ्याशी, इथल्या मातीशी ऋणानुबंध होते़ माजी आमदार पी़ डी़ दलाल यांचे स्रेही असलेले  इनामदार  यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ नोव्हेंबर २०१५ रोजी दलाल यांचा झालेला सन्मान आजही अनेकांच्या स्मरणात राहिलेला आहे़ 
शहरातील स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने कमलाबाई हायस्कूल येथे माजी आमदार प्रा. पी. डी़ दलाल यांनी शिक्षण क्षेत्रासाठी व समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त      अरविंद इनामदार धुळ्यात आले होते. त्या वेळी त्यांनी धुळ्यातील त्यांच्या पोलीस अधीक्षक पदाच्या  कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला होता़ त्याकाळी अरविंद इनामदार यांचे नाव काढताच गुंडांच्या छातीत     अक्षरश: धडकी भरायची, असे जुन्या निवृत्त झालेल्या पोलीस  कर्मचाºयांकडून सांगण्यात आले़ इनामदार यांनी धुळ्यात ११ जून १९७१ ते २३ मार्च १९७२ या कालावधीत धुळ्यात ५० वे पोलीस अधीक्षक या महत्वाच्या पदावर कार्यरत होते़ त्या काळी गुंडावर मोठी जरब त्यांनी बसविली होती़ कुठेही कारवाई करीत असताना त्यांनी कोणाचाही मुलाईजा बाळगला नव्हता़ थेट स्वत: जावून त्यांनी कारवाईचे सत्र अवलंबिले होते़ त्याकाळी डबल सीट बसून सायकल चालविण्याची परवानगी नव्हती, सायकलीला लाईट नसेल तरी कारवाई होत होती़ सायकलीवर डबलसीट जातांना कोणी आढळले तर इनामदार हे त्यांना पकडायचे आणि एक तर त्यांच्या सायकलीची हवा  काढून घ्यायचे नाहीतर सायकल चालविणाºयाची टकली करायचे़ एकंदरीत पाहता जागेवरच शिक्षा देण्याचा त्यांचा फंडा अनेकांना घाबरुन सोडायचा़ पोलिसांना कामाच्या तुलनेत खूप कमी वेतन दिले जाते. पोलिसांचा दर्जा सुधारण्यासाठी महसूल विभागाप्रमाणे पोलिसांच्या वेतनश्रेणीत वाढ केली पाहिजे. दहशतवादासारख्या प्रश्नाचा मुकाबला हा सर्व देशांनी मिळून करावा लागेल असे त्यांना वाटत होते़ 

धुळ्यातील बसस्थानकासमोर पोलीस प्रशासनाचे नवे मैदान तयार करण्याचा विषय पटलावर आला होता़ मैदान करीत असताना त्या ठिकाणी निंबाचे झाड असावे, जेणे करुन येणाºया जाणाºयांना सावलीचा आधार मिळू शकेल़ त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि आजच्या स्थितीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानालगत इनामदार यांच्या हस्ते लावण्यात आलेले त्या काळातील छोटेसे रोपटे आजच्या स्थितीत वटवृक्षात रुपांतर झाले आहेत़ त्यानिमित्त त्यांची आठवण ताजीच आहे़  

Web Title: Arvind Inamdar had a loan agreement with Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे