धुळे : मोहाडी उपनगरातील राहुल मिंड खून प्रकरणातील सर्व संशयितांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़मोहाडी ग्रामस्थांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ या गुन्ह्यातील संशयितांवर धुळे जिल्ह्यासह नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यातही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ संशयितांसह त्यांच्या साथीदारांनी गावात हैदोस मांडला आहे़ गुन्ह्यातील साक्षीदारांनाही खून करण्याची धमकी दिली जात आहे़ मोहाडी पोलिसांचा वचक नसल्याने हा खून झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़निवेदनावर नगरसेवक राजेश पवार, कुणाल पवार, देविदास गावडे, संतोष गावडे, दिलिप शिंदे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र मराठे, भगवान पाटील, प्रफुल्ल गोसावी, बन्स गोसावी, दिपक जाधव, सागर धुमाळ, दिनेश बच्छाव, संदिप बोरसे, योगेश खैरनार, अक्षय शिंगोडे, तेजस मिंड, प्रितेश कोकणे, मनोज पाटील आदींच्या सह्या आहेत़
सर्व संशयितांना त्वरीत अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:33 IST