शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

खासगी हाॅस्पिटलमध्ये ३७० बेडची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच १० हजार ९१ बाधित रुग्ण महानगरात ...

जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच १० हजार ९१ बाधित रुग्ण महानगरात आहे. त्यापैकी धुळे तालुक्यातील २ हजार १९६, शिरपूर ३ हजार ४२४, शिंदखेडा २ हजार ४७३ तर साक्री तालुक्यातील १ हजार ९९८ बाधितांना काेरोनाची असे एकूण ००० जण चारही तालुक्यातून आढळून आलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडापासून बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्यात आहेत. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या ००००वर गेली आहे. काेरोना बाधित रुग्णांमध्ये महानगरातील संख्या शंभरावर आहे. बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असलेली रुग्ण ४१ ते ५० वर्ष वयोगटातील अधिक आहेत. तर ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी आहे.

बाधित संपर्कात असलेल्या व्यक्तींची तपासणीत वाढ

दोन ते अडीच महिने कोरोना बाधितांच्या रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे तालुकास्तरावरील कोेविड केअर सेंटरदेखील बंद ठेवण्यात आलेे होते. त्यामुळे बाधितांची केवळ भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये तपासणी केली जाते होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून बाधित रुग्णांचा आकडा वाढल्याने कोरोना बाधित संपर्कात असलेल्या व्यक्तींची तपासणीत वाढ झाली आहे.

उपचार सुरू असलेले बाधित

आतापर्यंत २० हजार ८४८ बाधित आढळून आलेले आहेत. त्यापैकी ३ हजार २१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यात महानगरातील १ हजार ७१९, धुळे तालुक्यातील १ हजार ४९८ आहेत. बाधितांवर तातडीने उपचार होण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आढावा बैठक घेऊन मनपाला सरकारी व खासगी हाॅस्पिटल मधील बेडची संख्या व नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरातील सिद्धेश्वर हाॅस्पिटलमधील ५०, विघ्नहर्ता ४०, सुधा ४०, केशरानंद २०, इन्स्टिट्युड ऑफ युरोलाॅजी १५, ओम क्रिटिकल ३०, खान्देश कॅन्सर २०, चंद्रकांत केले फाऊंडेशन ३०, सेवा हाॅस्पिटल ४०, निरामय ३०, श्रद्धा ४०, भतवाल १५ अशा महानगरातील १२ हाॅस्पिटलमधील ३७० बेडची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.

बिल आकारणीवरदेखील लक्ष

महानगरातील १२ हाॅस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान होणारा खर्च रुग्णांकडून अधिक आकारणी केली जाते किंवा वैद्यकीय साेयी- सुविधेची अडचण आहे का, याबाबत मनपाकडून नियुक्त पथकाकडून वेळोवेळी माहिती व खासगी हाॅस्पिटलला भेटी तसेच रुग्णांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासंर्दभात मनपात आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या जातात.

फेब्रुवारीनंतर शहरात झाले २८२ कंटेन्मेंट झोन

शहरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे अनेक भागात महापालिकेला कंटेन्मेंट झोन जाहीर करावे लागले. शहरात आतापर्यंत २८२ कंटेन्मेंट झोन जाहीर झाले आहे. शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार बाधिताच्या घरापासून शंभर मीटरच्या परिसरात कंटेन्मेंट झोन केल जात असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.