APMC Election Result: दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 18:17 IST2023-04-29T18:17:01+5:302023-04-29T18:17:43+5:30

सर्व 18 जागांवर मिळविला विजय

APMC Election Result: BJP MLA Jayakumar Rawal has one-handed power in Dondai market committee elections | APMC Election Result: दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता

APMC Election Result: दोंडाईचा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता

राजेंद्र शर्मा

धुळे – शिंदखेडा - दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळविला आहे.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार. समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचा पराभव करण्यासाठी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, माजी आमदार रामकृष्ण पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, सेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे आणि  जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी एकत्रित येवून पॅनल तयार केले होते. पंरतू तालुक्यातील गावांचे कारभारी म्हटले जाणारे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सेवा सोसायटीतील सदस्यांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवला.

केवळ ग्रामपंचायतीच्या सरासरी 1048 वैध मतांपैकी रावल यांच्या विजयी उमेदवारांना 683 मते मिळाली म्हणजे 65 टक्के मते घेत विजय संपादन केला तर सोसायटी मतदारसंघातील एकुण 1390 वैध मतांपैकी 846 मते म्हणजेच 60 टक्के मते घेत विजय मिळविला. आमदार जयकुमार रावल यांनी तालुक्यातील 6 नेत्यांना एकही जागा न मिळू देता एक हाती विजय मिळविला, असे निकालाचे विश्लेषण करता येईल.

Web Title: APMC Election Result: BJP MLA Jayakumar Rawal has one-handed power in Dondai market committee elections