पिंपळनेर : जिल्हा परिषद निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसला तीन जागा मिळाल्या.मात्र या तीनही जागा साक्री तालुक्यातूनच मिळाल्याने, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान पिंपळनेर गटातून राष्टÑवादी कॉँग्रेसच्या सुदामती विजय गांगुर्डे यांनी तब्बल ६०२९ मते मिळवित विजय मिळविला आहे. त्यांच्या या विजयाबद्दल शहरात मोठा जल्लोष करण्यात आला.जिल्हा परिषद निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसला तीन जागा मिळाल्या. या सर्व जागा साक्री तालुक्यातूनच मिळाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कायम आहे. तालुक्यात गटामध्ये पिंपळनेर, छडवेल कोर्डे, जैताणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. सदर उमेदवारांनी स्थानिक उमेदवारांचा पराभव करीत यश मिळविण्यात यशस्वी ठरले आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचा त्यांच्या मतदारसंघात मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी केला. विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपळनेर गटातील सुदामती विजय गांगुर्डे यांनी ६०२९ मते मिळविली आहे. त्याच्या विजयाबद्दल शहरात गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला. सर्वांना सोबत घेत गांगुर्डे हे यशस्वी ठरले. राष्टÑवादीच्या उर्वरित उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात गांगुर्डे या यशस्वी ठरल्या आहेत. पश्चिम पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेस गटात जागा मिळविण्यात यशस्वी ठरली आहे. तसेच छडवेल कोर्डे गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयकुमार गुलाबराव अहिरे हे ४५५१ मते मिळवीत विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल गटात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तसेच तालुक्यातील जैताणे गटात डॉ. नितीन पोसल्या सूर्यवंशी यांनीही विजय मिळविला आहे. यामुळे माळमाथा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. सूर्यवंशी यांच्या विजयाबद्दल त्यांच्या गटात सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले प्राबल्य टिकून ठेवले आहे.
विजयानंतर राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:53 IST