शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बेड वाढविण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST

शासकीय असो वा खासगी रुग्णालयात कोविडबाधितांसह अन्य वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत़ या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांनी ...

शासकीय असो वा खासगी रुग्णालयात कोविडबाधितांसह अन्य वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत़ या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांनी इतर आजाराच्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा देण्यासह कोविड युनिटमधील आयसीयू तसेच ऑक्सिजन आणि साधारण बेडची संख्या कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागत आहे़ वाढविण्यात आलेले आयसीयू, व्हेंटिलेटर, तसेच सर्वसाधारण रुग्णखाटांची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला सादर करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासन कोविड रुग्णांलयातील रुग्णखाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी कोविड संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक धुळेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे़

ऑक्सिजन पुरवठ्याची विचारणा

येथील कोरोना रुग्णालयाला सद्य:स्थितीत ऑक्सिजन किती पुरवठा होत आहे़; भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास किती ऑक्सिजनची गरज पडू शकते याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे़

अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकला

शासकीय असो वा खासगी रुग्णालय; या ठिकाणी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात़; परंतु जिल्ह्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलून नॉनकोविड बेड हे कोविड रुग्णांना देता येतील का? या दृष्टीने कार्यवाही करावी लागणार आहे़ एकंदरीत पाहता रुग्णालयात अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया आता पुढे ढकलता येईल का? याचीदेखील चाचपणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यामार्फत स्वतंत्र १०० खाटांची सोय करण्यात आली़ स्नेहनगरात तात्पुरते रुग्णालय स्थापन करण्यात आल्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल़ या ठिकाणी अलगीकरण, विलगीकरणासह स्रावांचीही तपासणी करून मिळणार असल्याचे सांगण्यात आले़