लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. अलिकडे मृत्यूंची संख्याही वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही या आदेशांवर कार्यवाही न करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्या पुढे पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यादव बोलत होते. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने उपलब्ध मनुष्यबळाचे परिपूर्ण नियोजन करावे. जिल्हा रुग्णालयासह शिरपूर, दोंडाईचा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आॅक्सिजनयुक्त बेड दोन ते तीन दिवसांत तयार करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये निर्देश देवूनही अद्याप कार्यवाही न करणा?्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईचे प्रस्ताव सात दिवसांत सादर करावेत. त्यासाठी अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचेही आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. पोलिस विभागाने विना मास्क फिरणाºयांवर कठोर कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अधिष्ठाता डॉ. सापळे, अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचारांची माहिती दिली.
कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:51 IST