पिस्तुल बाळगणारा आरोपी अखेर पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:17 IST2019-05-25T22:17:05+5:302019-05-25T22:17:32+5:30
शिंदखेडा येथील घटना

पिस्तुल बाळगणारा आरोपी अखेर पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील बिजासनी मंगल कार्यालय जवळ रिधम अॅक्वा फिल्टर चे व्यवस्थापक मोहन माळी याला राहुल पाटील याने डोक्याला पिस्तुल लावून जीवे ठार मारण्याची धमकी २२ मे रोजी ५ वाजेच्या सुमारास दिली़ माळी यांनी शिंदखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो पसार झाला आहे़
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर राहुल पाटील हा त्या नंतर रात्री उशिरापर्यंत गावातच आपल्या साथीदारांसह मोटारसायकलवर फिरत असताना अनेकांनी पाहिले होते़ पोलिसांनी रात्री उशिरा फिर्याद घेतल्यानंतर सदर तरुणाला या मुळे पळून जाण्यास वेळ मिळाला तर गेल्या दोन दिवसांपासून सदर राहुल पाटील यांचा शोध पोलीस घेत आहेत़ राहुल हा त्याच्या मूळ गावी चिलाने गावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ मात्र त्याची चाहूल लागल्याने दुचाकीवरुन चिलाने गावातून निघून दोंडाईचा शिंदखेडा रोडवर विरदेल गावाकडे पसार झाला़ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र, तो काही हाती लागला नाही़ त्याला वेळीच पकडण्यात शिंदखेडा पोलिसांना अपयश आले आहे़