बाभळे फाट्याजवळ पोलीस कर्मचा-याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:05 IST2018-06-19T12:01:11+5:302018-06-19T12:05:25+5:30

महामार्गावरील घटना : पोलीस दलात हळहळ

Accidental death of police personnel near Shabale Jat | बाभळे फाट्याजवळ पोलीस कर्मचा-याचा अपघाती मृत्यू

बाभळे फाट्याजवळ पोलीस कर्मचा-याचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देबाभळे फाटाजवळील घटना अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक पोलीस कर्मचाºयाचा अपघाती मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र अंबर मोहीते (४५) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे़ 
पोलीस कर्मचारी राजू मोहिते शिंदखेडा येथील आपले कर्तव्य बजाविल्यानंतर दुचाकीने धुळ्याकडे येत होते़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोनगीर नजिक बाभळे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ ही घटना मंगळवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ पोलीस मुख्यालयातून ते गेल्या ६ महिन्यांपुर्वीच शिंदखेडा पोलीस स्टेशनला त्यांची बदली झाली होती़ 

Web Title: Accidental death of police personnel near Shabale Jat