शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:35 IST

वंचित बहुजन आघाडीची धुळ्यात निदर्शने

धुळे : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन केले. शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत धुळ्यात निदर्शन करण्यात आली. पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. धुळे येथे क्युमाइन क्लबजवळ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संसदेने केलेले शेतीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे तीनही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी देशपातळीवर लावून धरली आहे. किमान आधारभूत किंमत देण्यात खासगी व्यापारी प्रामाणिक राहणार नाही. त्यामुळे याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद करावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या तीनही घटक पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु केवळ पाठिंबा न देता राज्याच्या विधीमंडळात शेतकरी हिताचे कायदे करावेत, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. अन्यथा महाराष्ट्र सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे आरोप होऊ शकतात. त्यातून सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होईल. राज्य शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.आंदोलनात राज चव्हाण, डाॅ. अजय माळी, भय्या पारेराव, शंकर खरात, ॲड. चक्षुपाल बोरसे, योगेश जगताप, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढतच आहे.

टॅग्स :Dhuleधुळे