शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अफूची तस्करी रोखली; लळींग टोलनाक्याजवळील कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 6:16 PM

एकास अटक : ११ किलो मुद्देमालासह कारही जप्त

ठळक मुद्देलळींग टोल नाक्याजवळील कारवाईअफूच्या मुद्देमालासह एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ मोहाडी पोलिसांनी मादक पदार्थांची तस्करी करणाºया एका संशयिताला कारसह ताब्यात घेतले़ कारची तपासणी केली असता त्यात ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा ११ किलो १०० ग्रॅम अफू आढळून आला आहे़ ३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्री नऊ वाजता झाली़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना अफूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन शहरानजिक लळींग टोलनाक्याजवळ सापळा लावण्यात आला़ शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास एमएच १९ सीएफ २५७९ क्रमांकाच्या पांढºया रंगाची कार येताच पोलिसांनी ती रोखली़ या कारची तपासणी केली असता कारमध्ये मादक पदार्थ असलेल्या अफूची बोंडे (डोडा) घेऊन शिरपूरहून नाशिककडे चोरट्या पध्दतीने घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले़ कारचालक मंगेश छोगालाल पावरा (३०, रा़ मांडळ, ता़ शिरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा ११ किलो १०० ग्रॅम अफू असलेल्या दोन गोण्या असा एकूण ३ लाख ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ पोलीस कर्मचारी प्रभाकर ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता संशयित मंगेश पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस कर्मचारी राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राम्हणे, श्याम निकम, सुनील भावसार, गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, सखाराम खांडेकर यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस