शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी ...

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी सायंकाळी ६ वाजता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यानंतर बसस्थानकावर बऱ्यापैकी वर्दळ हेाती. मात्र रात्री सर्वत्र शुकशुकाट होता.

धुळे विभागाच्या दररोज अडीच ते तीन हजार फेऱ्या ग्रामीणसह विविध शहरांत होत असतात. मात्र सोमवारी तब्बल ११५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका दिवसात विभागाला ३० ते ३५ लाखांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातही बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासही काहीच अर्थ नसल्याने प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले आहे. या जनता कर्फ्यूच्या कालावधीत ग्रामीण भागातील सर्वात जास्त फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसारच गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. मंगळवारीही दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार २० फेऱ्या कमी झालेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तेथील जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याचाही परिणाम बसेसच्या प्रवासी संख्येवर झालेला आहे.

बुधवारपासून नियमित फेऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच जनता कर्फ्यू असला तरी त्यानंतर विभागातील बसफेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू होतील की नाही हे प्रवासी संख्येवरच अवलंबून आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात

प्रवासी नसल्याने महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. काही भागात टॅक्सीसेवा सुरू असून, त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. मात्र गरज असल्याने प्रवासीही जादा पैसे देत आहेत.

आर्थिक संकटातून सावरत नाही तोच पुन्हा धक्का

गेल्या वर्षी २३ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण बससेवा बंद होती. यात महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. २५ मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तर १९ ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र दिवाळीपासून बसला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. यातून महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते. या संकटातून बाहेर येत नाही तोच पुन्हा जनता कर्फ्यू लागू लागल्याने महामंडळाच्या नुकसानीत भरच पडत आहे.