आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा विकास कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:54 IST2020-01-12T22:53:53+5:302020-01-12T22:54:27+5:30
साक्री : निजामपूर येथील म्हसाई माता ट्रस्ट येथे उद्घाटन

Dhule
साक्री : डोंगरी शाळेतील शिक्षणानंतर दऱ्या-खोºयातील आदिवासी विद्यार्थी महू फुलांची विक्री करून मिळालेल्या पैशाने उच्चशिक्षण घेण्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाने शहराकडे आला. महू फुलांचा उपयोग कोणी मद्यासाठी करत असेल. मात्र, अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी याचा उपयोग आत्मविश्वास आणि प्रेरणेसाठी केला, असे प्रतिपादन विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मोहन पावरा यांनी केले.
साक्री येथील सी.गो. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत निजामपूर येथील म्हसाई माता ट्रस्ट येथे आयोजित विद्यापीठस्तरीय तीन दिवशीय ‘आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा विकास’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मोहन पावरा, उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, डॉ.शशीकांत बोरसे, सिनेट सदस्य प्रा.संजय सोनवणे, निजामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार, नंदुरबार बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ.संजय शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.हसीम शेख, जगदीश शाह, ईश्वर सोनवणे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, डॉ.सचिन नांद्रे, डॉ.संजय खोडके, प्रा.डी.एल. पाटील, रघुवीर खारकर, कार्यशाळा समन्वयक डॉ.लहू पवार आदी उपस्थित होते.
पावरा पुढे म्हणाले की, पूर्वी जल, जंगल, जमीन, जनावरे सारख्या संस्कृतीची जोपासना करणारा आदिवासी विद्यार्थी लाजरा होता म्हणून शहरातील शाळा-महाविद्यालयांकडे जाण्यास घाबरत होता. त्यांना आता शहराच्या शाळांची वाट सापडली आणि अशा कार्यशाळांमुळे निश्चितच अजून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते भविष्यात उत्तुंग भरारी घेतील, असे सांगितले. डॉ.शशिकांत बोरसे यांनी समाजातील विविध उदाहरणे देऊन आत्मविश्वास आणि प्रेरणा कशी मिळते, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार यांनी आदिवासी विद्यार्थी प्रयत्नवादी असल्याचे सांगितले. रघुवीर खारकर, प्रा.हसीम शेख आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ.लहू पवार, सुत्रसंचलन डॉ.ज्योती वाकोडे, आभार प्रदर्शन प्रा.भूषण अहिरराव यांनी केले. कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, डॉ.ए.पी. निकम, डॉ.प्रदीप राठोड, प्रा.विश्वास भामरे, विद्यार्थी प्रतिनिधी अजय गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.