२६ वर्षापासून फरार घरफोड्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:08 IST2019-10-11T22:07:54+5:302019-10-11T22:08:17+5:30

एलसीबी : मालेगाव येथून मुसक्या आवळल्या

Abandoned house gajaad abducted for 26 years | २६ वर्षापासून फरार घरफोड्या गजाआड

२६ वर्षापासून फरार घरफोड्या गजाआड

धुळे : गेल्या २६ वर्षापासून पोलिसांना कायम गुंगारा देणारा अट्टल घरफोड्या अब्दुल शेख सांडू याच्या मालेगाव येथून मुसक्या आवळण्यात यश आले आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी  केली़ 
धुळ्यातील घरफोडी गुन्ह्यातील  १९९३ पासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार अब्दुल शेख सांडू हा मालेगाव येथे  फिरत आहे़ अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार, पथकाने सापळा रचला आणि शुक्रवारी सकाळी मालेगाव गाठले़ याठिकाणी नूर नगर भागात सापळा लावून अब्दुल शेख सांडू याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.त्याला अटक करुन मालेगाव येथून आणल्यानंतर सायंकाळी उशीरा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस     उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, पोलीस कर्मचारी चेतन कंखरे, मनोज पाटील, केतन पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Web Title: Abandoned house gajaad abducted for 26 years