अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

By अतुल जोशी | Updated: January 31, 2024 18:09 IST2024-01-31T18:07:57+5:302024-01-31T18:09:07+5:30

आरोपीविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

A minor girl was molested, the accused was sentenced to 10 years | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

धुळे : शिरपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भारत बुधा कोळी (वय ३२, रा. शिरपूर) यास १० वर्षांचा सश्रम कारावास व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निकाल जिल्हा सत्र न्यायालय -२ तथा विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी आज दिला.

शिरपूर शहरात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी भारत कोळी याने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ११ मे २०१९ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली होती.

आरोपीविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व उपनिरीक्षक नमिता घुगे यांनी केला. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, त्याला भादंवि कमल ३७६(१) व पोक्सो कायदा २०१२ चे कमल ६ मध्ये १० वर्षे सश्रम कारावास व ३५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. गणेश पाटील यांनी काम पाहिले. 

Web Title: A minor girl was molested, the accused was sentenced to 10 years