अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

By अतुल जोशी | Updated: March 1, 2024 19:38 IST2024-03-01T19:38:18+5:302024-03-01T19:38:29+5:30

याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

A minor girl was molested, a case was registered at Shindkheda police station | अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला नातेवाईक असलेल्या तरुणाने पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना, आरोपीने तिला तुझ्या आई-वडिलांकडे सोडून देतो, असे खोटे सांगून मोटारसायकलवर बसविले. पीडितेला एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घडलेला प्रकार पीडितेने आपल्या पालकांना सांगितला. अखेर तीन दिवसांनंतर २९ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वादहा वाजता संशयित आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(आय)(जे)(एन)सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन २०१२चे कलम ४, ६८, १२ प्रमाणे बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक ठाकूर करीत आहेत. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रेड्डी, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस निरीक्षक मिलिंद पवार यांनी २९ रोजी सायंकाळी भेट दिली.

Web Title: A minor girl was molested, a case was registered at Shindkheda police station