धुळे जिल्ह्यात ८ हजार सिंचन विहिरींचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:41 PM2018-04-24T17:41:20+5:302018-04-24T17:41:20+5:30

बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार

8,000 irrigation wells in Dhule district | धुळे जिल्ह्यात ८ हजार सिंचन विहिरींचे काम सुरू

धुळे जिल्ह्यात ८ हजार सिंचन विहिरींचे काम सुरू

Next
ठळक मुद्देआर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंत सिंचन विहीरींच्या प्रस्तावांना मंजुरी, कार्यादेश देण्याचे अधिकार हे गटविकास अधिकारी स्तरावर होते. मात्र विहीरींना मंजुरी देणे तसेच कार्यादेश काढताना पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढत असल्यामुळे आता मंजुरीचे अधिकार हे जिल्हा परिषद स्तरावर म्हणजेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : समृद्ध महाराषट्र जनकल्याण योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-२०१८ या दोन वर्षात दहा हजार ८०५ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी ८ हजार १८ विहिरींचे कार्यादेश दिल्यामुळे कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, आतापर्यंत २ हजार ८२ विहिरी मार्गी लागलेल्या आहेत. सिंचन विहिरींमुळे जिल्ह्यात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. 
रोजगार हमी योजने अंतर्गत आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांसाठी विहीरींचे लक्षांक देण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यासाठी सात हजार ८६६ विहीरींचे उद्दीष्ट देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र दहा हजार ८०५ विहीरींना मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवातीला असलेल्या उद्दिष्टाच्या  तुलनेत साक्री तालुक्यासाठी एक हजार आणि शिंदखेडा तालुक्यासाठी दोन हजार अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते. मंजूर केलेल्या विहिरींपैकी ८ हजार १८ विहिरींची प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात आली.
त्यात धुळे तालुका २ हजार ८११, साक्री तालुका २ हजार ३२०, शिंदखेडा तालुका १ हजार ९९९, शिरपूर तालुका ८८८ विहिरी मंजूर करºयात आल्या आहे. आतापर्यंत २ हजार ८२ विहिरींचे काम पूर्ण झालेली आहेत. त्यात सर्वाधिक ९८८ विहिरी शिंदखेडा तालुक्यात पूर्ण झालेल्या आहेत. तर सद्य:स्थितीत आठ हजार १८ विहीरींची कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकºयांना सिंचन विहीरींमुळे जीवनमान सुधारावे तसेच गावातल्या मजुरांना गावातच रोजगार मिळावा अशा दुहेरी हेतूने या विहीरींना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान,  सलग दोन वर्षाचे उद्दिष्ट एकाच वेळेस देण्यात आल्यामुळे चालू आर्थिक वर्षात  विहीरींचे वाढीव उद्दिष्ट आलेले नाही. तसेच नवीन विहीरींच्या कामांना मंजुरीदेखील देण्यात आली नाही.
 

Web Title: 8,000 irrigation wells in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.