शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात 80 टक्के तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:45 IST

तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

धुळे : जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये तरुणाईचा भरणा अधिक आहे. सध्या शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपैकी ८० टक्के कैदी हे तरुण आहेत. तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. तरुण वयातील जोश गुन्हेगारी मार्गात वाया जात आहे.जिल्हा कारागृहात एकूण ३२५ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात १८ ते २५ वयोगटातील ४० कैद्यांचा समावेश आहे. २५ ते ४० या वयोगटातील सर्वाधिक कैदी धुळे जिल्हा कारागृहात आहेत. २५ ते ४० या वयोगटातील तब्बल २६३ कैदी आहेत, तर त्यापेक्षा अधिक वयाचे २२ कैदी सध्या शिक्षा तुरुंगवास कंठत आहेत. महिला कैदीही कारागृहात आहेत. २३ महिला कैदी सध्या तुरुंगवासात आहेत.गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात दररोज नवनवीन घटना खळबळ माजवत आहेत. चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र धुळे शहरात काही दिवसांपासून सुरू आहे. एटीएम फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. मागील आठवड्यात तर एकाच दिवसात तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने चोरट्यांचा तो प्रयत्न फसला होता. त्या गुन्ह्यातील चोरटे अजूनही सापडलेले नाहीत. जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांतील अनेक आरोपी अजूनही पसार आहेत, तर काहींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यापैकी काही कैदी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अलीकडे जिल्ह्यात गांजा पकडण्याच्या अनेक कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. गांजा, चरस आदी गुन्ह्यातील १४ कैदी कारागृहात आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील सर्वाधिक कैदी कारागृहात आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल १३० कैदी आहेत. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींची संख्या कमी आहे. दरम्यान, तुरुंगातील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता मात्र सर्व कैदी कोरोनामुक्त झाले असून, तुरुंग कोरोनामुक्त असल्याचे तुरुंग अधीक्षक डी. जी. गावडे यांनी सांगितले. कोरोनामुळे कैद्यांच्या त्यांच्या परिवाराशी होणाऱ्या मुलाखती बंद आहेत, मात्र व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच एटीएमच्या बाहेर उभे राहून वृध्द व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यास एटीएम कार्ड अदला बदल करून खात्यातून पैसे काढण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबाबत पोलीसाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे