शिंदखेडा रथ गल्लीत घराचे कुलूप तोडून 73 हजार रु रोख व 2 तोळे सोने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 13:58 IST2021-03-11T13:58:35+5:302021-03-11T13:58:44+5:30

शिंदखेडा :येथील रथगल्लीत राहणारे छोटू तुकाराम चौधरी यांच्या बंद घरचे कुलूप तोडून चोरत्यानी घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ...

73,000 cash and 2 ounces of gold stolen by breaking the lock of a house in Shindkheda Rath street | शिंदखेडा रथ गल्लीत घराचे कुलूप तोडून 73 हजार रु रोख व 2 तोळे सोने चोरी

शिंदखेडा रथ गल्लीत घराचे कुलूप तोडून 73 हजार रु रोख व 2 तोळे सोने चोरी

शिंदखेडा :येथील रथगल्लीत राहणारे छोटू तुकाराम चौधरी यांच्या बंद घरचे कुलूप तोडून चोरत्यानी घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले 73 हजार रु रोख व दोन तोळे सोने असा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद शिंदखेडा पोलिसात देण्यात आली आहे घटनास्थळी फिंगरप्रिंट एसक्स पर्ट व स्वानपथक धुळे येथून मागवले होते त्यांनी शहरातील हेंडल चौकापरेनंत जाऊन तेथेच घुटमळत राहिले आज शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांनी घटना स्थळी भेट दिली चोरीचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत

येथील रथ चौकात राहणारे छोटू तुकाराम चौधरी हे दि 3 मार्च रोजी पारोळा येथे सासूची तब्बेत बिघडली म्हणून ते पतीसह पहावयास गेले होते त्यात ते 10 तारखेला परत आले तेव्हा त्यांना घराचे दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेले दिसले  त्या नंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील पत्री कपाट तुटलेले व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले त्यात त्यांनी कपाशी विकून ठेवलेले 73 हजार रुपये रोख व 15 ग्राम सोन्याचा 15 हजार किमतीचा व कानातील 7 ग्राम वजनाचे सोन्याचे 7000 रु किमतीचे त्याप्स चोरीस गेल्याची फिर्याद शिंदखेडा पोलिसात दिली त्या नुसार शिंदखेडा पोलिसांनी स्वानं पथकास पाचारण केले ते घटनास्थळावरून सुमारे 500 मीटर अंतरावरील हेंडल चौकापरेनंत चोरट्याचा माग दाखवला तसेच ठसे तज्ज्ञांनी चोरत्यांच्या ठसे घेतल्याचे सांगण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.

Web Title: 73,000 cash and 2 ounces of gold stolen by breaking the lock of a house in Shindkheda Rath street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.