४० फूट खोल विहिरीतून ६५ वर्षीय वृद्ध महिलेला सुखरूप काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:33+5:302021-06-04T04:27:33+5:30
शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जयशंकर काॅलनीत प्रभाकर येवले आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या ...

४० फूट खोल विहिरीतून ६५ वर्षीय वृद्ध महिलेला सुखरूप काढले बाहेर
शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जयशंकर काॅलनीत प्रभाकर येवले आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या ६५ वर्षीय पत्नी प्रतिभाबाई या नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात झाडू मारत होत्या. तेव्हा अंगणात असलेल्या ४० फूट खोल विहिरीत त्या लोखंडी झाकणासह पडल्या. विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आल्याने कुटुंबीय धावून त्याठिकाणी आले. त्यांनी ताबडतोब महापालिकेच्या अग्निशामक दलाला फोन लावला. त्यानंतर मनपाचे अग्निशामक दलाचे पथक तातडीने त्याठिकाणी मदतीला पोहोचले. त्यांनी तातडीने मदत कार्यास सुरुवात केली. विहीर खोल असली तरी, ती रुंदीला खूपच लहान असल्याने खाली उतरून महिलेला बाहेर काढणे हे खूप जिकिरीचे काम होते. परंतु शिडीच्या मदतीने एक कर्मचारी ४० फूट खोल विहिरीत खाली उतरला आणि त्याने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर प्रतिभाबाई यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. त्या सुखरूप बाहेर आल्याचे पाहून कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. तसेच मदत करणाऱ्या मनपाच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
मनपाच्या पथकाचे अधिकारी तुषार ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन अमोल सोनवणे, दुष्यंत महाजन, योगेश मराठे, गोपाल माळी आणि मुर्तडकर यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पाड पाडली.
- महिलेच्या नातेवाईकांच्या कोटसाठी जागा सोडावी